शिरुर तालुक्यातील अधिका-याचा वर्ध्यात दरारा

Image may contain: 4 people, people standing and indoor
Image may contain: 1 person, eyeglasses and closeupशिरुर, ता. ७ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : त्या मुध्याधिका-याच्या कामाच्या अनोख्या शैलीने अनेकांना दिवसाच दरदरुन घाम फुटत असून संपुर्ण वर्धा जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील या अधिका-याच्या धडाकेबाज कामांची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

मुळचे शिरुर तालुक्यातील संविदणे या गावचे असणारे असणारे मिनिनाथ दंडवते हे वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर उच्च शिक्षण शिरुर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयात झाले. अत्यंत शिस्तप्रिय समजल्या जाणा-या दंडवते यांची कारकिर्दही तशी वादळी. वनविभागात अधिकारी पदापासुन काम केलेल्या विविध चार भागातील नोकरी सोडून महानगरपालिका व नगरपालिका  प्रशासनात मुख्याधिकारी म्हणुन काम करण्याची हि पाचवी वेळ. पिंपरी चिंचवड, लातुर अशा बड्या महानगरपालिकांमध्ये कामाचा ठसा उमटविल्यानंतर काही महिन्यांपुर्वी हिंगणघाट येथील नगरपालिकेत दंडवते हे रुजू झाले आहेत.

या ठिकाणी रुजू झाल्यानंतर अनेक प्रश्न असताना दंडवते यांनी स्वच्छता अभियानाचे काम हाती घेत काही दिवसांतच शहराचा कायापालट करुन दाखविला. याचबरोबर करडी शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या दंडवतेंनी नागरिकांनाही शिस्त लावून दिली. या स्वच्छता अभियानासाठी त्यांनी इतर सर्व विभागांबरोबर शिक्षकांनाही सामावुन शहर चकाकुन दाखविले.

धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या दंडवतेंनी अनेक काळ खुर्चीला चिकटुन बसलेल्या, निष्क्रिय अधिका-यांना बडगा दाखवत काम करायला भाग तर पाडलेच परंतु ज्याची ज्या पदावर नियुक्ती आहे त्या पदास समांतर काम करण्यास भाग पाडले.कामचुकारांना कारणे दाखवा नोटिसा बजावत थेट निलंबनाचाही सपाटा लावला.त्याचबरोबर ज्या ज्या विभागात कंञाटी काम करत आहेत. त्या-त्या विभागात न.पा.द्वारे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याही कामावर लक्ष ठेवले जात आहे.
 
मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांच्या दबंग अन धडाकेबाज कामगिरीमुळे अनेक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मरगळलेल्या नगरपालिकेला चांगला अधिकारी मिळाला असल्याच्या भावना नागरिकांमध्ये आहेत.
Image may contain: tree, house, plant, sky and outdoor

Image may contain: outdoor

Image may contain: outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या