शिरुरला दिवसाढवळ्या चोरी करणारे अटकेत (Video)

शिरुर, ता.७ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) :  दिवसाढवळ्या खिशातील पैसे चोरी करुन पसार होणा-या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरी करणा-या पुरुषासह महिलांनाही पोलीसांनी अटक केली आहे.

या चोरीप्रकरणी रामराव वसंत राऊत (वय. ६०,रा. गव्हाणवाडी, ता.श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणी वैशाली संदिप काळे, रेश्मा हरिभाउ काळे, कुलकर्णी रामभाउ चव्हाण, कविता भगवान भोसले (सर्व रा. पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राउत हे पत्नीसह शिरुर मधील सुभाष चौकातील कुलथे ज्वेलर्स यांच्या दुकानात सोन्याच्या दागिन्यांची उधारी ९००० रुपये देण्यासाठी आले होते.दुकानात ग्राहक जास्त असल्याने फिर्यादी हे पत्नीसह दुकानातील सोफ्यावर बसलेले असताना शेजारीच दुकानात एक इसम बसला होता.व तीन महिला बाहेर उभ्या होत्या.फिर्यादी राउत हे पैसे देण्यासाठी उठले असताना शेजारील इसम व त्या तीन अनोळखी महिला तेथुन निघुन गेल्या.त्यानंतर फिर्यादी राउत हे पैसे देण्यासाठी गेले असता खिशातील पैसे चोरीला गेले असल्याचे लक्षात आले व हि चोरी वरील आरोपींनीच केली असल्याची खाञी झाल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली.

शिरुर पोलीस स्टेशनला याबाबत चोरीची हकिकत सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,उमेश  भगत यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी संबंधित ठिकाणी धाव घेउन माहिती घेउन त्या वर्णनाच्या व्यक्तींचा परिसरात शोध घेतला असता, त्या वर्णनाच्या संशयित व्यक्ती पोलीसांना मिळुन आल्या.

या वेळी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले.पोलीसांनी वरील आरोपींकडून अंगझडतीत फिर्यादी राऊत यांचे चोरलेले नऊ हजार रुपये जप्त केले.या चोरीप्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे उमेश भगत हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या