शिरुरला 'हल्लाबोल' साठी राष्ट्रवादीची फ्लेक्सबाजी

शिरुर,ता.९ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : राष्ट्रवादीच्या हल्लबोल आंदोलनाच्या जिल्हयातील पहिल्या सभेसाठी राष्ट्रवादीने शिरुर तालुक्यात फ्लेक्सबाजी करुन वारेमाप पैशाची उधळपट्टी केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पुणे जिल्हयात  हल्लाबोल आंदोलनाची पहिली जाहिर सभा शिरुर येथे आयोजित करण्यात आली असुन या सभेला राज्यातील बडे बडे नेते उपस्थित राहणार आहे.

या आंदोलनासाठी राष्ट्रवादीने शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी मोठ-मोठे फ्लेक्स लावले असुन या फ्लेक्सवरच जोरदार उधळपट्टी केली असल्याची तालुकयातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.राष्ट्रवादीने गावोगावी यासाठी सभा घेतल्या असुन राष्ट्रवादीचा ही हल्लाबोल आंदोलनाची तयारी कि विधानसभेची तयारी याबाबतही गावोगावी नागरिकांमध्ये चर्चा होताना पाहावयास मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या