आमदार पाचर्णेंचा माजी आमदारांवर जोरदार 'हल्लाबोल'

Image may contain: 1 person, smiling, sittingशिरुर,ता.९ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : 'ज्यांनी यशवंत बंद पाडला त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर बोलुच नये' अशी घणाघाती टिका करत आमदार बाबुराव पाचर्णेंनी माजी आमदार अशोक पवार यांच्यावर हल्लाबोल आंदोलनापुर्वीच जोरदार 'हल्लाबोल' चढविला.
सध्या राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरु केले असुन पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जिल्हयात पहिलीच सभा होत असल्याने शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या हल्लाबोल आंदोलनाला उत्तर देण्यासाठी पञकार परिषद आयोजित केली होती.यावेळी पाचर्णे यांनी विविध मुद्दयांवर चर्चा केली.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे पंधरा वर्षे सत्तेत होते.पंधरा वर्षात त्यांनी शेतक-यांसाठी लागणारे पाणी, वीज, दळणवळणासाठी ग्रामीण रस्ते, अशा प्राथमिक गोष्टींकडे लक्ष दिले नाही.त्यांच्या कार्यकाळात सिंचन घोटाळा झाला.तो घोटाळा शिरुर तालुक्यात दिसुन येत असुन डिंभा उजवा अपुर्णावस्थेत असुन त्याला ही खुप गळती होते.त्यामुळे शेतक-यांमध्ये वाद होत आहेत.चासकमान कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असुन त्याला चाळिस टक्के गळती होते.आवतर्णात कालवा फुटतो.या गोष्टीला सर्वस्वी तत्कालीन सत्ताधारीच जबाबदार आहेत.

हल्लाबोल च्या निमित्ताने सरकारवर निशाना साधणा-या व स्थानिक लोकप्रतिनिधींवर टिका करणा-यांना शेतक-यांची खरी तळमळ असेल तर न्हावरा येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार का ? कारखान्यातील स्टोअर रुम मधील सर्व व्यवहार पारदर्शी होण्यासाठी स्टोअर रुम अॉनलाईन करणार का  असा सवाल माजी आमदार अशोक पवार यांना करत आपल्या आमदारकारकीच्या काळात यशवंत कारखाना का  बंद पडु दिला याचं पहिलं उत्तर पवार यांनी द्यावं असा सवाल शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केला.

वढु आपटी साठी साडेतीन कोटी, पिंपळे जगताप ते वढु साठी तीन कोटी, धर्मवीर संभाजी महाराज समाधीस्थळ  या ठिकाणी पुण्यातिथी साजरी करण्यासाठी सुमारे ६० लाख रुपयांची विविध कामे त्या ठिकाणी सुरु आहेत.मी वढु गाव दत्तक  घेतल्यानंतर, पुर्वी संभाजी महाराज पुण्यातिथी साठी पुणे जिल्हा बॅंक निधी द्यायची परंतु ग्रामपंचायत ने पाठपुरावा करुनही ते पैसे दिले नाही.मग कोट्याविधी रुपये नफा मिळविणारी बॅंक  संभाजी महाराजांसाठी का निधी देत नाही.याचा खुलासा अजित पवारांनी करावा.शेतक-यांसाठी जर तुम्ही हल्लाबोल करत असाल,तर घोडगंगेसाठी नगर जिल्हयात उस आणताना कार्यक्षेञातील शेतक-यांचा उस आणत नाही, पश्चिम भागातील उस नेत नाही.मग हे सर्व व्यंकटेश पोसण्यासाठी चालले आहे का ? असा  सवालही त्यांनी केला.व्यंकटेश उभारताना सुमारे १५००० शेतक-यांकडुन दहा हजार रुपये प्रमाणे भांडवल घेतले होते.ते भांडवल कुठे आहे? त्या शेतक-यांना सभासद करुन घ्यायचे नसेल तर त्यांचे घेतलेले पैसे माघारी देणार का असा प्रश्न उपस्थित केला.

यशवंत कारखाना सुरु करन्याबाबत आम्हांला प्रश्न विचारता तर मग यशवंत कुणी बंद पाडला? तेव्हा तर तुम्ही सत्तेतील आमदार होते.यशवंत बंद पडु नये म्हणुन तुम्ही प्रयत्न का केले नाहीत.आता  कारखाना सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मग तुम्ही अडचणी का आणता?ज्यांनी यशवंत बंद पाडला त्यांनी शेतक-यांविषयी बोलु नये.ह्यांनी कितीही विरोध केला तरी कारखाना सुरु केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

या सरकारने सत्तेत आल्यापासुन आरोग्य, वीज, पाणी, शेतकरी या प्रश्नांची सोडवणुक केली असुन विरोधी पक्षाला हल्लाबोल करण्याची काहीच गरज नाही.शिरुर तालुक्यात १६ हजार महिलांना उज्वला गॅस कनेक्शन दिले.औद्योगिक पट्टयात गेल्या साडेतीन वर्षात मोठा कोणताच वाद झाला नसुन कामगारांचे सातत्याने सोडविले.विजेच्या बाबतीत शिरुर तालुक्यात २२ केव्हीचे २९८ ट्रान्सफॉर्मर, ११ केव्हीचे ३२७ ट्रान्सफॉर्मार,न्हावरे व शिरसगाव काटा येथील ११ केव्हीच्या उपकेंद्रांची क्षमतावाढ केली असुन मुलींसाठी ८ कोटी ५० लक्ष रुपयांचे वसतीगृह उभारले आहे.जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत शिरुर तालुक्यातील ३३ गावांत ६ कोटी,हवेलीत १६ गावांत ४ कोटी रुपयांची कामे केली आहेत.शिरुर तालुक्यात २६७ सिंचन विहिरींची कामे पुर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार मोहिमेत कामे चांगली केल्याने शिरुर तालुक्यात अद्याप कोठेही टॅंकरची मागणी नाही. शिरुर तालुक्यात ५३ कोटी ९७ लाख रुपयांची रस्त्यांची, हवेलीत १३ कोटी ७२ लाख रुपयांची कामे रस्त्यांची होत आहेत.अशी माहिती पाचर्णे यांनी पञकार परिषदेत माहिती दिली.   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या