शिरुरला अश्विनी सातव-डोकेंचे बुधवारी व्याख्यान

शिरुर, ता.१० एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सातव डोके यांचे व्याख्यान बुधवार(दि.११) रोजी  आयोजित केली असल्याची माहिती ज्योती साविञी जयंती उत्सव समितीचे किरण बनकर यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना बनकर म्हणाले कि,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची १९१ वी जयंती शिरुर येथे बुधवार(दि.११) रोजी साजरी केली जाणार असुन सकाळी अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर साहित्यिक,लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सातव डोके यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला शिरुर शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बनकर यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या