शिरुर तालुका शिवसेनेचं आजपासुन 'शिवसंपर्क अभियान'

शिरुर, ता.१० एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने आजपासून शिवसंपर्क अभियान सुरु केले असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार,शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ यांनी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, शिवसंपर्क अभियानांतर्गत  शिवसेनेने गावभेट दौ-याचे नियोजन केले असुन या निमित्ताने गावोगावचे प्रश्न समजुन घेतले जाणार आहे. आज मंगळवार (दि.१०) रोजी याची सुरुवात करडे गावापासुन केली जाणार असुन याची सांगता शुक्रवार(दि.१३) रोजी होणार आहे.

या वेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक श्रद्धाताई कदम,युवासेनेचे जिल्हाधिकारी गणेश कवडे,उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, जिल्हा समन्वयक मच्छिंद्र गदादे,शिरुर शहर प्रमुख संजय देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, उपतालुकाप्रमुख शिवाजी मचाले, रोहिदास शिवले,मधुकर भंडारी, अशोक दरेकर, महिला तालुका  संघटक विजया टेमगिरे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख अनिल पवार, युवा तालुका अधिकारी राम देवकर, युवासेना रोहित कुरंदळे, युवासेना शहर अधिकारी सुनिल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या