सुधीर फराटेंच्या अपाञतेला सहकारमंञ्यांची स्थगिती

मांडवगण फराटा, ता.१० एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : घोडगंगेचे संचालक सुधीर फराटे यांच्या अपाञतेला राज्याचे सहकारमंञी सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे.

घोडगंगा  कारखान्याचे संचालक सुधीर फराटे हे शरद सहकारी बॅंकेचे थबकबाकीदार असल्याच्या कारणावरुन सागर फराटे यांनी साखर संचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ नुसार अपाञतेची मागणी करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजुंचे म्हणने ऐकुन घेउन साखर सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी संचालकपद रद्द करण्याबाबत आदेश दिला होता.

या निर्णयाच्या विरोधात फराटे यांनी सहकारमंञ्यांकडे धाव घेत अपील दाखल केले होते.या अपिलावर सहकारमंञ्यांनी निर्णय देत स्थगिती अर्जावर मंजुरी दिली असुन त्यावर प्रतिवादी साखर सहसंचालक यांच्या दि.०७.०३.२०१८ च्या आदेशास व अंमलबजावणीस मुळ पुनरीक्षण अर्जावर सुणावनी होउन अंतिम निर्णय होइपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. या निर्णयामुळे एकप्रकारे सुधीर फराटे यांचे संचालकपद अंतिम निर्णय  होइपर्यंत कायम राहिले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना फराटे म्हणाले कि, राजकिय द्वेषापोटी तक्रार करण्यात आली होती.परंतु या माध्यमातुन योग्य न्याय मिळाला आहे.शिरुर च्या सहायक निबंधकांनी सोसायटी संचालक पाञ असलेबाबत या पुर्वी निर्णय दिला होता. सहकारमंञ्यांनी दिलेल्या निर्णयामुळे त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या