मांडवगण फराट्यात महिलेला धमकावत चार लाखांची चोरी

Image may contain: indoorमांडवगण फराटा, ता.११ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील घाडगेतळई येथे चोरट्यांनी महिलेला चाकुचा धाक दाखवुन धमकावुन सुमारे चार लाख १५ हजार रुपयांची सोने व रोख रक्कम लुबाडुन नेण्याची घटना मंगळवार (दि.१०) रोजी सकाळी आठ वाजता घडली.

याबाबत कांचन सुधीर गायकवाड(वय.२०,रा.मांडवगण फराटा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पती,सासु सासरे, दीर, आजेसासरे व एक मुलगी यांच्यासोबत मांडवगण फराटा येथील घाडगेतळई येथे राहत आहे.फिर्यादी यांचे निंबी (ता.श्रीगोंदा) येथील नातेवाईक वारल्याने त्यांच्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्य(दि.९) रोजी गेले होते.घरी फक्त पती सुधीर गायकवाड व लहान मुलगी श्रेया असे तिघेच होते. आज मंळवार (दि.१०) रोजी घरातील सगळी कामे आटोपुन फिर्यादीचे पती त्यांच्या शेतात राहत्या घरापासुन १ कि.मी अंतरावर सकाळी आठच्या सुमारास मोटर चालु  करण्यासाठी गेले होते.तेव्हा फिर्यादी या लहान मुलीला घरातील बाथरुम मध्ये अंघोळ घालत होत्या.त्या वेळी बाहेरुन अज्ञात व्यक्तीने बाबा पाणी द्या असा आवाज दिला. त्यावेळी फिर्यादी यांनी घराच्या बाहेर जाउन पाहिले असता, दोन अनोळखी इसम फिर्यादी यांच्या घरासमोर उभे होते. त्या इसमांनी फिर्यादीकडे पाणी पिण्यासाठी द्या अशी मागणी केली. या फिर्यादी या पाणी आणण्यासाठी चालले असता, दोन इसमांपैकी एक बेडरुम मध्ये तर दुसरा देवघरात घुसला. फिर्यादी यांनी त्यांना मज्जाव केला असता दोन पैकी एकाने फिर्यादीच्या गळ्याला चाकु लावुन धमकावले व गळ्यातील काढुन दे अशी मागणी केली.

Image may contain: house and outdoorफिर्यादी यांनी घाबरुन गळयातील सर्व सोने काढुन दिले. दुसरा इसम फिर्यादीच्या बेडरुम मधील कपाटाकडे जाउन कपाटातील स्टिल चा डबा घेण्यासाठी वाकला.तेव्हा फिर्यादी या इसमाला हिसका  देउन शेजारच्या घरी धाव घेतली व अशोक गायकवाड यांना चोर आल्याचे सांगितले.त्यानंतर फिर्यादी सह संदिप गायकवाड, बापू गायकवाड व घरातील इतर लोकांनी फिर्यादीच्या घराकडे धाव घेतली.तेव्हा ते दोन इसम पळुन गेले. वरील चोरट्यांचे वय तीस ते ३५ वयोगटातील असुन दोघांनी हातात काळया रंगाचे मोजे घातलेले होते.

या चोरीत अर्धा तोळा वजनाचे १२५०० किंमतीचे गळयातील मंगळसुञ, १ लाख २५ हजार किंमतीचे  पाच तोळे वजनाचे चेन मधील गंठण पाच तोळे वजनाचे,अर्धा तोळे वजनाचे कानातील १२५०० रुपये किंमतीचे दोन टॉप्स,तीन पदरी गंठण १ लाख १२ हजार रु किंमतीचे साडेचार तोळे वजनाचे, २५०० रुपये किंमतीचे दोन कानातील कुडके, रोख रक्कम १ लाख ५० हजार असा सर्व मिळुन ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.दिवसाढवळया घडलेल्या या घटनेने शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात एकच खळबळ उडाली आहे.नागरिक भयभीत झाले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या