आढळराव भावनिक राजकारण करतात: अजित पवार (Vdo)

शिरुर, ता. ११ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : शिरुरचे खासदार हे निवडणुक आली कि भावनिक राजकारण करतात अशी टिका माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी शिरुर येथील हल्लाबोल आंदोलनात केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने संपुर्ण राज्यभर हल्लाबोल यात्रा सुरु असून पुणे जिल्ह्यातील पहिली हल्लाबोल आंदोलनाची जाहिर सभा  शिरुर येथील पाबळ फाटा येथे झाली.यावेळी पवार हे बोलत होते.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, शिरुर चे खासदार हे निवडणुक आली कि भावनिक राजकारण करतात असा आरोप करुन बैलगाडा शर्यतींची आठवण करुन देत आमचं सरकार निवडुन द्या बैलगाडा शर्यत सुरु करुन दाखवितो असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले कि, या सरकारच्या काळात शेतक-यांचे प्रश्न मोठया प्रमाण निर्मान झाले असुन शेतमालाला बाजार भाव नाही, युवकांना रोजगार नाही.पोलीस भरती थांबवली.शिक्षकांची भरती बंद आहे, मराठी माध्यमाच्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा  बॅकेतील भरती बंद आहे लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मागणी  संदर्भात चर्चा शासनाने करावी. जीएसटी मुळे व्यापारांचे कबरंडे मोडले आहे.हे सरकार फक्त आश्वासन देत असुन अंमलबजावणी माञ करत नाही.अधिवेशनात तर कहरच केला असुन प्राणीसंग्राहालय केलं असुन जनतेच्या मुदद्यावर पुर्णपणे दुर्लक्ष केलं.कोरेगाव भीमा येथे घटना घडत राज्यातील  सत्तेतील एक मंञी तेथे उपस्थित होता.परंतु त्या मंञ्याने केवळ बघ्याचीच भुमिका घेतली.या सरकारने तेथे पोलीस संरक्षण अधिक पुरवणे गरजेचे असताना पोलीस बंदोबस्त जास्त दिला नाही.त्यामुळे अनुचित प्रकार घडला.कारण नसताना दोन समाजात तेढ निर्माण केली गेली.निष्पाप लोकांची घरे जाळली गेल्याचे ते म्हणाले.कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा मास्टरमाईंड  कोण हे शोधावे हे कोणामुळे घडले हे महाराष्ट्रचा जनतेला कळले पाहिजे.

नगरच्या घटनेसंदर्भात आमदार संग्राम जगताप यांचा या घटनेशी सबंध नाही.कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्ताची हत्या  होणे चूकीचे आहे कायदा हातात घेण्याचा आधिकार कोणालाही नाही.या सरकारची अवस्था वाफसा उठुन गेल्यानंतर पेरनी करायची अवस्था आहे.या सरकारकडून गलिच्छ राजकारण केलं जातयं असा घणाघात त्यांनी या वेळी केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या