चांगले नागरिक घडण्यासाठी 'बालसंस्कार'महत्वाचे: परदेशी

Image may contain: 1 person, standingन्हावरे, ता.११ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : आई-वडील व गुरुजनांनी मुलांवर लहानपणापासून केलेले संस्कार मुले अंगीकारतात आणि ही संस्काराची शिदोरी व्यक्तीच्या जीवनाला आकार देते.चांगले नागरिक घडण्यासाठी बालमनावरील संस्कार महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन मराठीचे अभ्यासक संतोष परदेशी यांनी न्हावरे येथील जिल्हा परिषद कांडगेवस्ती येथील इ.४ थी च्या मुलांच्या निरोप संभारंभानिमित्त बोलताना केले.

त्यांनी यावेळी श्यामची आई या पुस्तकातील  संस्काररूपी गोष्टींचे दाखले देऊन मुलांशी व पालकांशी संवाद साधला.यावेळी मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झालेले शाळेचे माजी विद्यार्थी अभिजीत कांडगे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मुलांनी व पालकांनी शाळेविषयी आपल्या भावना मनोगतामधून व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास भगत, बापू सानप,विठ्ठल कर्पे भाऊसाहेब, बाळासाहेब कांडगे, सहादू कर्पे, शिवाजी गावडे, हिरामण कर्पे, विलास कांडगे, किरण कांडगे, राहूल जगदाळे, गोरक्ष भुजबळ, शिवाजी कर्पे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संतोष वेताळ यांनी तर आभार भारती भोसले यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या