आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनाने घेतली दखल

Image may contain: 7 people, people smiling, people standingमागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षक-शिक्षकेतरांचे आमरण उपोषण स्थगीत
तळेगाव ढमढेरे, ता. 12 एप्रिल 2018 (एन. बी. मुल्ला): राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मंगळवार (ता. 10) पासून सुरू झालेल्या आंदोलनाची व आमरण उपोषणाची सरकारने तात्काळ दखल घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन सध्यातरी स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वराज्य शिक्षक संघांचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी दिली.

स्वराज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले होते या उपोषणाची सरकारने दखल घेत शिष्टमंडळला तत्काळ चर्चेसाठी मंञालयात बोलविले. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी मंत्री राम शिंदे यांचेकडे सर्व प्रश्नांबाबत सहानभुतीने विचार करुन आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतरांना न्याय देण्याची मागणी केली असता संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांचे समवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आणि सर्व प्रश्न सोडविण्याचे मंत्री राम शिंदे यांनी मान्य केले. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि आमदार विक्रम काळे यांच्याशी सर्व शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर आमरण उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
Image may contain: 9 people

पुढील काळामध्ये स्वराज्य शिक्षक संघ आणखी सक्रियपणे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बांधवांसाठी पाठपुरावा करेल असा विश्वास यावेळी शिष्टमंडळाने सर्व कर्मचार्‍यांना दिला. यावेळी शिष्टमंडळात स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष फत्तेसिंह पवार, प्रदेश सरचिटणीस प्रविण देवरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रविण वाबळे, प्रदेश संघटक बबन वाघमारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुभाष शेडबाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप गोसावी यांचेसह स्वराज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या