स्वप्नील ढमढेरेला राष्ट्रीय मिश्र दुहेरीत कास्य पदक

Image may contain: one or more people, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे,ता.१३ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) :  स्वप्नील ढमढेरे याने राष्ट्रीय  धनुर्विद्या स्पर्धेत मिश्र दुहेरीत कास्य पदक पटकावले.

भारतीय धनुर्विद्या संघटना व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने १४ व्या वरिष्ठ धनुर्विद्या स्पर्धा  १० एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत स्वप्नील ढमढेरे पहिल्या गुणांकन मध्ये  ३६० पैकी ३४९ गुण घेऊन देशा मध्ये दुसरा  राहिला तर स्वप्नील ढमढेरे (पुणे) व पूर्वशा शेंडे (अमरावती) या खेळाडूंनी महाराष्ट्राचे मिश्र दुहेरीचे प्रतिनिधित्व करताना   कर्नाटक, झारखंड  व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा दारून पराभव करत कांस्य पदक पटकावले.

याच स्पर्धेमधून २०१८ च्या आशियाई निवड चाचणी साठी  खेळाडू निवडण्यात येणार आहेत. स्वप्नील ढमढेरे याची गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम्स २०१८ साठी निवड झाली आहे.स्वप्नील ढमढेरेचे या यशासाठी महाराष्ट राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, पुणे जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव विकास मानकर व अर्चर्स अकॅडमी चे व्यवस्थापक  रणजीत चामले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या