शिरुर तालुक्यात भिमजयंती उत्साहात साजरी

शिरुर, ता. १५ एप्रिल २०१८ (अभिजित आंबेकर) : शिरुर येथे भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिरुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करायला विविध क्षेञांतील मान्यवरांसह तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवार(दि.१४) रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे,तहसिलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,माजी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल, नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे, स्वच्छता  व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ,पाणी पुरवठा सभापती विठ्ठल पवार, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, संजय देशमुख, महिला व बालकल्यान समिती सभापती सुनिता  कुरुंदळे, शिक्षण समिती सभापती मनिषा कालेवार, मागावर्गीय कल्याण विशेष समिती सभापती पुजा जाधव, नगरसेवक मंगेश खांडरे, नगरसेवक विनोद भालेराव, भाजपचे संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, भाजपचे शहराध्यक्ष केशव लोखंडे, शहरउपाध्यक्ष निलेश नवले, अल्पसंख्याक आघाडीचे राजु शेख, समता परिषदेचे किरण बनकर, संतोष शितोळे, लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, माजी नगराध्यक्ष नसीम खान, आरपीआय दक्षिण महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा.रमेश गायकवाड, सर्व नगरसेवक, नगरसेविका व शिरुर, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील नागरिक हे मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या चार दिवसांपासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बुधवार(दि.११) रोजी प्रा.रमनीताई सोणवणे यांनी मी साविञीबाई फुले बोलतेय हा एकपाञी नाट्यप्रयोग सादर केला.यावेळी प्रसिद्ध उद्योजिका शोबहाताई धारिवाल यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आले.गुरुवार (दि.१२) रोजी कार्यक्रमातील दुसरे पुष्प गुंफताना राज्यातील नामवंत कवींनी वैचारिक, वादळी कवी संमेलन सादर केले.या कवी संमेलनासाठी कवयिञी रमनी सोनवणे, आकाश सोनवणे,नितीन चंदनशिवे, सागर काकडे,सुमित गुणवंत,रविंद्र कांबळे,ह्रदयमानव अशोक, डॉ.स्वप्निल चौधरी, जित्या जाली या कवींनी एकापेक्षा एक बहारदार कवीता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.तर तिसरे पुष्प शुक्रवार (दि.१३ रोजी) श्रीकांत बरिंगे यांच्या व्याख्यानाने झाले.शनिवार (दि.१४) रोजी सकाळी अभिवादनाचा, सायंकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली.तसेच संकल्प गोळे यांच्या भिमगीतांच्या गायनाचा कार्यक्रम करण्यात आला.

सलग चार दिवस चालणा-या  भिमजयंती उत्सव कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाउ झेंडे, विनोद शिंदे, प्रमोद गायकवाड, मनोज गाडेकर, कैलास गायकवाड, रमेश शिंदे, संतोष जगताप, संजीव सारोळकर, अॅड.मायाताई गायकवाड, वैशाली गायकवाड, वंदना शिंदे, संजया नितनवरे, निलेश जाधव, अविनाश गाडेकर, सतीश उबाळे, शरद गायकवाड, सुदेश म्हस्के आदींनी सुयोग्य नियोजन करुन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पाडला.

गुजर प्रशालेत डॉ. आंबेडकर जयंती साजरी
तळेगाव ढमढेरे(प्रा.एन.बी.मुल्ला) :
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Image may contain: 9 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशालेचे प्राचार्य माणीक सातकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, योगेश चव्हाण, चंद्रकांत क्यँग, नितीन माने, मोहन ओमासे, महेश नांदखीले, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य माणीक सातकर यांनी  डॉ. आंबेडकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवून सर्वधर्म समभावाने रहाण्याचे आवाहन केले.

डॉ.बाबासाहेबांचे तत्व अंगिकारा- प्रा.शिवाजी वाळके
निमोणे,(प्रा.बाळासाहेब गायकवाड)
"डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण, स्वाभिमान आणि शिल या तत्वांचा जीवनामध्ये अंगीकार केल्यानेच ते ' महामानव ' झाले. " असे प्रतिपादन अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी केले.
Image may contain: 17 people, people smiling, people standing
निमोणे (ता. शिरूर) येथे ' संयुक्त जयंती उत्सव समितीच्या ' वतीने आयोजित युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य म.ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित ' अभिवादन सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी उपस्थितांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाय मिरवणूक टाळुन प्रबोधन आणि विचारमंथनावर अधिक भर देण्यात आला.युवकांची संख्या लक्षणीय होती. यावेळी बोलताना श्री.वाळके पुढे म्हणाले की, " भगवान गौतम बुद्धांपासुन सर्वच राष्ट्रपुरुषांनी समाज उद्धाराचे काम केले.एकाचे काम दुसऱ्याची प्रेरणा ठरत गेले. म्हणुन या महापुरुषांना आपण विशिष्ट समाजाच्या मर्यादेत पाहू नये. त्यांचे कार्य अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी होते. आपल्या जीवनामध्ये या महापुरुषांचे विचार अंगीकारल्यास सर्व समाज सुखी होईल.यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविंद्र काळे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते दिलिप काळे,दहिवडीचे सुरेश दौडकर, तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, सलोनी दिवटेआदिनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र काळे,सरपंच उर्मिलाताई काळे, उपसरपंच प्रविण दोरगे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, जिजाताई दुर्गे, माजी उपसरपंच श्रीधर जगताप, रविंद्र थोरात, जे.आर. काळे, डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, बापूसाहेब जाधव, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, प्रहार संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष दिपक काळे, अभिनेते अमोल थोरात, दिलिप पांडव, मयुर ओस्तवाल, बिभिषण गायकवाड, कैलास गायकवाड, संजय दिवटे, अनिल कांबळे, अमोल कांबळे, सागर जाधव, जालिंदर सातपुते, सागर जाधव, राहुल काळे, भरत हिंगे यांसह मोठया प्रमाणावर युवावर्ग उपस्थित होता.बापूसाहेब जाधव यांनी स्वागत व सुत्रसंचालन तर बिभिषण गायकवाड यांनी आभार मानले.

विठ्ठलवाडी येथे भाजपच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

विठ्ठलवाडी(प्रा.एन.बी.मुल्ला)
विठ्ठलवाडी येथे भारतीय जनता पक्ष शाखेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Image may contain: 4 people, people standing and outdoor
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजीआप्पा गवारे, विठ्ठलवाडीच्या सरपंच ललिता गाडे, उपसरपंच बाबाजी गवारे, भाजपा अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे अध्यक्ष दिलीप शेलार,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रघुनंदन गवारे, माजी उपसरपंच राजाभाऊ शिंदे, दिलीप गवारे, माजी सरपंच अलका राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्रापूर ग्रामपंचायतीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी
शिक्रापुर(प्रा.एन.बी.मुल्ला)
शिक्रापूर ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती  उत्साहात साजरी करण्यात आली.
Image may contain: 9 people, people sitting, people standing and indoor
शिक्रापूर(ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गलांडे, पोलिस उपनिरीक्षक भोसले, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, राजेंद्र मांढरे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, जयश्री दोरगे, मिना सोंडे, ग्रामविकास अधिकारी आर.आर. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या