जनावरे खात होती माती; त्यांनी दाखविली माणुसकी (Vdo)

Image may contain: 2 people, outdoor and natureकोंढापुरी, ता.१६एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : उन्हाचा वाढलेला कडाका अन चा-या नसल्याने जनावरांची होणारी तडफड असे भयानक दृश्य असताना कोंढापुरीतील माजी सरपंचांनी धाव घेत जनावरांना जगविण्याचे काम केल्याने शिरुर तालुक्यात त्यांच्या या माणुसकिचे कौतुक करण्यात येत आहे.सविस्तर हकिकत अशी कि, कोंढापुरी हद्दीत सुरूची डेअरीजवळ पुणे-नगर रस्त्यालगत 10 गुंठे क्षेत्रात पुणे येथील व्यक्तीचा गोठा आहे.या गोठ्यात सर्व प्रकारची जनावरे आहेत.या जनावरांना सांभाळण्यासाठी गोठा मालकाने कामगाराची नेमणुक केली आहे.परंतु अनेक दिवसांपासुन या गोठ्याकडे मालक फिरकलाच नव्हता. कामगार देखभाल करत होता परंतु परिस्थितीपुढे त्यानेही हात टेकल्याने अखेर त्याचाही नाइलाज झाला.या मुक्त गोठ्यातील जनावरांची चार दिवसांपासून अन्न व चारा नसल्याने उपासमार होत होती.

दरम्यान येथील महावितरणचे लाईनमन श्री. ढाकणे हे विजेचे काम करण्यासाठी गोठ्याजवळ रविवारी गेले असता गोठ्यातील जनावरे चक्क माती खात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकाश मोरे या कामगारांने गोठ्याचे मालक तीन महिन्यांपासून इकडे आलेले नाहीत, आतापर्यंत मालकांकडून मिळालेल्या पैशातून चारा आणून जनावरांना जगविले आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून जनावरांनाही चारा नसल्याचे सांगितले.ढाकणे यांनी जनावरांच्या उपासमारीची कल्पना गावचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांना सांगितली. गायकवाड यांनी या घटनेची तातडीने दखल घेत घटनास्थळी जाउन पाहणी केली. यावेळी जनावरे चा-या विना तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी हि अवस्था पाहता लागलीच  स्वतःच्या शेतातील उसाचे दोन टेम्पोभरून चारा आणून जनावरांना खायला घातला.

याबाबत माजी सरपंच  स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले कि, जनावरांबाबत  माहिती मिळताच तातडीने गोठ्यात भेट दिली असता,जनावरे अक्षरश: माती खात असुन कित्येक दिवस उपाशी असल्याचे दिसले.त्याच वेळी काहि जनावरांना उपचारांची गरज असल्याने काहि जनावरांवर वैद्यकिय उपचार केले.

कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल  गायकवाड व महावितरणचे लाईनमन यांच्या तत्परतेबद्दल व माणुसकिबद्दल शिरुर तालुक्यात  सर्वञ कौतुक केले जात आहे.|
Image may contain: one or more people, sky, outdoor and nature

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या