कथुआ अत्याचारप्रकरणी शिरुरकर उतरले रस्त्यावर...

शिरुर,ता.१६ एप्रिल २०१८(सतीश केदारी) : कथुआ व उन्नाव अत्याचाराच्या घृणास्पद घटनांच्या निषेधार्थ समस्त शिरुरकरांनी आज(दि.१६) रोजी मुकमोर्चा काढुन रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला.
जम्मु काश्मीर येथील कथुआ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली होती.या घटनेनंतर उन्नाव येथेही असाच निंदनीय प्रकार घडला होता.या अत्याचाराचा निषेध म्हणुन शिरुर शहरातील आदीशक्ती महिला संघटना,मुस्लिम युवा मंच, वारसा फाउंडेशन, शिवजयंती उत्सव समिती, रामलिंग महिला उन्नती, युवा स्पंदन ग्रुप,अॅक्टिव्ह ग्रुप, वैभवी महासंघ, लोकशाही क्रांती आघाडी, शिरुर शहर विकास आघाडी, स्वामिनी ग्रुप, विविध पक्ष, संघटना, नागरिक व सर्व धर्मिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी लता नाझिरकर, झाकिरखान पठान, अॅड.मायाताई गायकवाड, संजय बारवकर, कामिनी बाफना, बापु सानप, योगेश जामदार, फरझाना मॅडम, सुजाता पवार, रविंद्र धनक, प्रविण गायकवाड आदींनी विचार व्यक्त करत आरोपींना कडक शिक्षा व्हावी,त्याचप्रमाणे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या