पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पांडूरंग नरके

Image may contain: 5 people, people standingतळेगाव ढमढेरे,ता.१७ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील पोलीस पाटील पांडुरंग विश्वनाथ नरके यांची शिरुर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या कार्यक्रमात राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते नरके यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष दादापाटील काळभोर, जिल्हाध्यक्ष रोहिदास शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता वाने, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बिनविरोध निवडण्यात आलेली पोलीस पाटील संघटनेची शिरुर तालुक्याची अन्य कार्यकारीणी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष : सारिका पाचूंदकर (रांजणगाव गणपती), उपाध्यक्ष : सुषमा थोरात (मलठण), मारुती शेलार(करंजावणे), सचिव : भास्कर वाव्हळ (शिंदोडी).

तालुक्यातील पोलीस पाटलांचे विविध प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच सर्वांना  बरोबर घेऊन काम करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पांडूरंग नरके यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या