विठ्ठलवाडीच्या आखाड्यात ३०० मल्ल सहभागी

विठ्ठलवाडी,ता.१८ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : येथे धोंडबाबा यात्रेनिमीत्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात ३०० मल्लांनी सहभाग घेतला. चित्तथरारक अशा कुस्त्यांच्या विविध डावांनी पैलवानांनी कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे समस्त ग्रामस्थ व हनुमान तरुण मंडळ आयोजित ग्रामदैवत धोंडबाबा यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी श्रींचा अभिषेक, महापूजा व छबीना कार्यक्रम सवाद्य पार पडला. यावेळी श्रींच्या पालखीचा मान दोरगे कुटुंबीयांकडे होता. ही परंपरा जपण्याचे काम गावकरी गेले अनेक वर्षांपासून करीत आहेत.

रात्री अंजली राजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशा तर श्री पांडुरंग मंदिरामध्ये पं. हरिश्चंद्र गवारे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. या आखाड्यात पुणे, अहमदनगर, मुंबई, रायगड या जिल्ह्यांसह पंचक्रोशीतून ३०० मल्लांनी हजेरी लावली.या आखाड्यात तुकाराम शितोळे, शिरूर कुमार केसरी गणेश काशीद, उपकेसरी सचिन  वडघुले या नामवंत मल्लांनी हजेरी लावली. तेजस शिंदे- सचिन वडघुले व आदर्श गुंड - तुकाराम शितोळे यांची अंतिम कुस्ती जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारी यांच्या हस्ते लावण्यात आली. या आखाड्यात पंच म्हणून लक्ष्मण गवारे, शिरूर केसरी अविनाश गवारे ,सतीश गवारे, उपसरपंच राजेंद्र शिंदे यांनी काम पाहिले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, सोसायटीचे अध्यक्ष काळूराम गवारी, उपाध्यक्ष  रायचंद  शिंदे ,आरएसएसचे विभाग संघचालक संभाजी गवारे, किसन गवारे, उपसरपंच बाबाजी गवारे, पोलीस पाटील चंद्रकांत गवारे, लव्हाजी लोखंडे, जगन्नाथ पवार,माजी सरपंच लोभाजी आल्हाट, माजी उपसरपंच दिलीप गवारे, सोपान गवारे, राजेंद्र शिंदे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मारणे, जयेश शिंदे, सोपान धुमाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. आखाड्यात समालोचक म्हणून रघुनंदन गवारे, संदिप गवारे व सोपान गवारे यांनी काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या