दहिवडी येथे वीज कोसळून नऊ जनावरांचा मृत्यू

Image may contain: sky, cloud, night and outdoorदहिवडी, ता. 19 एप्रिल 2018: मंगळवारी (ता. 17) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून आठ मेंढ्या व एक बैल मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱयांवर मोठे संकट कोसळले आहे.

वीज कोसळल्याने कोंडिबा दगडू शिंदे यांच्या सात मेंढ्या व एक कोकरू आणि संतोष शिवाजी इंगळे यांचा एक बैल मृत्युमुखी पडला आहे. न्हावरे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. पडवळ, करंजावणे येथील पशुधन पर्यवेक्षक आर. के. पोटे व गाव कामगार तलाठी अमोल थिगळे यांनी तातडीने पंचनामा केला. यामध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीच्या जनावरांचे आर्थिक नुकसान झाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

सरकारने त्वरित मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या