सरदवाडीतील 'त्यांनी' घडविले ज्येष्ठांना देवदर्शन

Image may contain: one or more people and outdoorसरदवाडी, ता.२० एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : सरदवाडीत नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणा-या 'त्यांनी' सुमारे ३५० ज्येष्ठांना नुकताच देवदर्शनाचा योग घडवुन आणला.ज्येष्ठांकडुन त्यांचे या कार्याबदद्ल कौतुक केले जात आहे.
Image may contain: 11 people, people standing, sky and outdoor
सरदवाडीतील माजी सरपंच विलास कर्डिले हे नेहमीच शिरुर पंचक्रोशीत विधायक उपक्रम राबवत असतात.काहि दिवसांपुर्वी त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ पुणे-नगर महामार्गावर होणा-या अपघातात जखमींचे प्राण वाचावे,तत्काळ उपचार मिळावेत यासाठी स्वखर्चातुन वडील मारुती धोंडिबा कर्डिले व प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.या रुग्णवाहिकेचे लोकापर्ण प्रसिद्ध उद्योजक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या हस्ते केले होते.

त्याचप्रमाणे सरदवाडीतील सामाजिक कार्यकर्ते हॉटेल रामराज्य चे मालक रामभाऊ (आप्पा) कर्डिले आणि माजी सरपंच विलासभाऊ कर्डिले यांच्या मातोश्री विठाबाई मारुती कर्डिले यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सरदवाडीतील सुमारे ३५० ज्येष्ठांना नुकताच शेगाव देवदर्शन यात्रेचा योग घडुन आला.रामभाऊ कर्डिले( हॉटेल रामराज्य) आणि सरदवाडी चे माजी आदर्श सरपंच विलासभाऊ कर्डिले(हॉटेल रायगड) आणि कविताताई लक्ष्मण घावटे यांच्या मातोश्री विठाबाई मारती कर्डिले यांचा ७५ वा वाढदिवस शेगाव श्री क्षेत्र गजानन महाराज निवास या ठिकाणी साजरा करण्यात आला.या निमित्ताने सोहम गोऱ्हाने यांचा सुश्राव्य अभंगवाणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या याञेबाबत सरदवाडीतील ज्येष्ठांशी संवाद साधला असता, अनेकांनी समाधान व्यक्त करत प्रथमच अशा प्रकारची याञा माजी सरपंच विलास कर्डिले यांच्यामुळे अनुभवायला मिळाल्याचे सांगितले.तर अनेकांनी भरभरुन कौतुक केले.आदर्श माजी  सरपंच विलास कर्डिले हे समाजकार्यात नेहमी पुढाकार घेत असुन त्यांनी सरदवाडी गावात विठ्ठलमंदिरात या पुर्वी रंगरंगोटी, एल.इ.डी स्क्रिन, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी बाके,भैरवनाथ मंदिराचे सभामंडप,विद्युत फिटिंग इ.समाजहिताची कामे केली असुन सरदवाडीतील अनेकांना  धार्मिक स्थळांची परिक्रमा घडवुन आणली आहे.तर या वेळी वाढदिवसाचे औचित्य साधुन देवदर्शन सहलीचे आयोजन केल्याने त्यांच्या औदार्याचे शिरुर व परिसरात कौतुक केले जात आहे.

विलास कर्डिले : 9225546419

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या