शिरुरच्या विक्रम पाटील यांना पोल व्हॉल्ट मध्ये सुवर्णपदक

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoorशिरुर,ता.२१ एप्रिल  २०१८(अभिजित आंबेकर) : मंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिरुरच्या अॅड. विक्रम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना पोल व्हॉल्ट या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवले.
या स्पर्धेचे संयोजन "दक्षिण कन्नडा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन" आणि "कर्नाटक मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन" यांनी संयुक्तपणे केले होते. इंडिया मास्टर्स अॅथलेटिक्स यांनी आयोजित केलेल्या "३८व्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशीप २०१८" या दि. १२ ते १५ एप्रिल दरम्यान या स्पर्धा कर्नाटकातील मंगलोर येथे पार पडल्या.

या स्पर्धेत देशभरातल्या सुमारे २००० खेळाडूंनी भाग घेतला होता. तसेच या स्पर्धेसाठी श्रीलंकेचाही संघ आमंत्रित म्हणून सहभागी झालेला होता.२००७ सालीही अॅड.विक्रम पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या ३७ व्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक  मिळविण्याची कामगिरी केली होती.त्यांच्या या कामगिरीबदद्ल शिरुर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या