शिंदोडीत भैरवानाथाची याञा उत्साहात संपन्न

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoorशिंदोडी, ता.२१ एप्रिल २०१८(तेजस फडके) : "येळकोट येळकोट जय मल्हार भैरवनाथाच्या नावानं चांगभलं" च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शिंदोडी (ता. शिरुर) येथील यात्रा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (दि १८) रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.

बुधवार (दि १८) रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान गावातील महिला सुवासिनींनी देवाला दंडवत घातले.त्यानंतर ग्रामस्थांनी पेढे व खोबऱ्याची शेरणी वाटप केली.रात्री ८ वाजता देवाच्या पालखीची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.रात्री ११ नंतर काळू-नामु वेळवंडकर यांचा वगनाट्य तमाशा पार पडला.

गुरुवार (दि१९) रोजी  दुपारी ४ ते ७ दरम्यान कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला.त्यात सुमारे ५०० मल्लांनी सहभाग घेतला.या आखाड्यात मल्लांना ५०० ते ५००० रुपया इनाम देण्यात आले.तसेच नॅशनल चॅम्पियन कु.कोमल खरात (खरातवाडी),महाराष्ट्र चॅम्पियन कु.प्रज्ञा भापकर(बेलंवंडी),महाराष्ट्र चॅम्पियन कु.शिवांजली पारखे(कर्जत) या महिला मल्लांनीही या आखाड्यात सहभाग घेतला.यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने या महिला मल्लांचा सन्मान करण्यात आला. पंच म्हणुन राजेंद्र वाळुंज, मोहन वाळुंज, अनिल पोपळघट दौलत ओव्हाळ, भाऊसो माने यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज,निलेश वाळुंज,पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ,विकासोचे माजी अध्यक्ष शिवाजी वाळुंज,सदस्य बाजीराव कोळपे, अंकुश खेडकर, नंदू वाळुंज, युवा कार्यकर्ते योगेश विठ्ठल ओव्हाळ, प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड, कृष्णा माने, शिवाजी ओव्हाळ, भगवंत वाळुंज, हभप रामदास महाराज फडके, अशोक वाळुंज, किसन होले व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या