पीके जळण्याच्या मार्गावर; आंदोलनाचा इशारा (Vdo)

Image may contain: 2 people, people standing, tree, sky, child, plant, outdoor and nature
न्हावरा, ता. 22 एप्रिल 2018:
न्हावरे आणि परिसरातील शेतकर्‍यांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसतोय. चासकमान धरण शंभर टक्के भरूनही शेवटपर्यंत पाणी पोहोत नसल्यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित शेतकऱयांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी प्रशासनावर टीकेच झोड उठविली आहे.प्रशासनाला पाण्याचे नियोजन करता येत नसल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असून, पिके जळू लागली आहेत. गेल्यावर्षीही न्हावरे आणि परिसरातील शेतकर्‍यांची उभी पीके जाळाली होती. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. यावर्षीही पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. अद्यापही वेळ गेलेली नाही. प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करावे, एवढीच माफक अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. तर आमच्यावर शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते, अशी प्रतिक्रिया त्रस्त शेतकरी नवनाथ तांबे​ यांनी व्यक्त केली तर पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा गोरख तांबे​ यांनी दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या