पिंपळसुटीतील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Image may contain: 1 person, sunglassesपिंपळ सुटी, ता. २४ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : पिंपळसुटी (ता. शिरुर) येथील एकाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली.

हौशीराम सुरेश पारखे (वय.४०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.या प्रकरणी सुरेश बापुराव पारखे यांनी फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हौशीराम पारखे हे ज्ञानदिप शिक्षण संस्थेच्या कवठा(ता.श्रीगोंदा) या शाळेत क्लार्क म्हणुन नोकरी करत होते.त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासुन त्याला मानसिक झाला होता तेव्हापासुन हौशीराम यांच्यावर बुधराणी हॉस्पिटल येथे उपचार सुरु असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

रविवार(दि.२२) रोजी राञी साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा  हौशीराम पारखे हा मोटारसायकल वरुन पिंपळसुटी गावात गेला तो राञी घरी आला नाही.म्हणुन घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला.परंतु तो मिळुन आला नाही.सोमवार(दि.२३) रोजी सकाळी फिर्यादी इनामगाव शिवेजवळील खालचा मळा येथील शेताकडे गेले असता हौशीराम यांनी लिंबाच्या झाडाला दोर बांधुन गळफास घेतला असल्याचे दिसले. यावेळी फिर्यादी यांनी हा प्रकार गावचे पोलीस पाटील तुकाराम वाबळे यांना सांगितला.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील  तपास मांडवगण पोलीस चौकीचे जमादार श्रावण गुपचे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या