शिरुरला हुडकोवासियांनी अडविल्या कच-याच्या घंटागाड्या

Image may contain: one or more people, people standing and outdoorशिरुर, ता.२४ एप्रिल २०१८ (अभिजित आंबेकर) : शिरुर येथील हुडको वसाहतीनजीक असलेला कचरा डेपोच्या आंदोलनाचा प्रश्न रविवार (दि.२३) रोजी  पेटल्यानंतर सोमवार (दि.२४) रोजी हुडकोतील नागरिकांनी कच-याच्या घंटागाड्या शिरुर नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये न येउ देता अडवून धरल्या.

या वेळी हुडकोतील रिक्षा पंचायत चे अनिल बांडे,महबुब सय्यद, अविनाश घोगरे,शैलेश जाधव,प्रसन्ना भोसले,अनिकेत घोगरे, अमित पंडित,प्रविण तुबाकी, सोनु भालेराव,शबीब पठान,रवि बैनाडे,मोहसिन शेख, वसिम शेख, अजिंक्य तारु,चेतन तुबाकी, विकास साबळे आदींनी त्या ठिकाणी येणा-या घंटागाड्या अडविल्या.कुठल्याही परिस्थितीत या घंटागाड्या खाली करु देणार नाही अशी भुमिका घेत त्या गाड्या कचरा डेपोच्या बाहेर अडविण्यात आल्या.

सुमारे दोन तासांच्या आंदोलनानंतर उपविभागीय गणेश मोरे यांनी भेट देउन आंदोलकांशी चर्चा केली.यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, पोलीस हवालदार गणेश आगलावे, किशोर धवडे, चौधरी आदी उपस्थित होते. त्यांच्या चर्चेनंतर हे  आंदोलन स्थगित करुन काही दिवस प्रशासनाकडून काही कार्यवाही होतेय का यावर चर्चेत एकमत झाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या