गणेगाव-वाघाळे परिसरात विजेच्या लपंडावाने शेतकरी ञस्त

No automatic alt text available.गणेगाव खालसा, ता.२४ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : गणेगाव खालसा-वाघाळे (ता. शिरूर) परिसरातकमी दाबाने व सततच्या विजेच्या लपंडावाने शेतकरी ञस्त झाले आहेत.

शिरूर तालुक्‍यातील गणेगाव खालसा, वाघाळे, वरूडे, पिंपरी या भागात बागायती क्षेञ मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातून चासकमानचा डावा कालवा गेल्याने शेतीला सुपीकता आली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी ऊस, कांदा, पालेभाज्या तसेच फळबागामधून पिके घेताना दिसतात. सध्या चासकमान कालव्यातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने चासकमान डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे शेतक-यांची उन्हाळी पिके वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. असे असताना या ठिकाणी थ्री फेजच्या माध्यमातून अवघे काही तासच वीज उपलब्ध होत आहे. तसेच सततच्या अनियमिततेमुळे नागरिकांना शेतीला पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. मध्यरात्री कधीतरी वीज येत असल्यामुळे शेतकऱयांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. तत्काळ या परिसरात पूर्ण दाबाच्या क्षमतेने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या