शिरुरच्या महसूल विभागाकडून ९५ लाखांचा दंड वसूल

शिरुर, ता.२५ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : शिरुरच्या महसुल विभागाने वाळु वाहतुकीवर धडक कारवाई करत ९५ लाख रुपयांचा दंड वसुल केला असुन अनधिकृत उत्खनन प्रकरणी १६ कोटी रुपयांच्या दंडाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.

तहसिलदार रणजित  भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत गौनखनिजाचे उत्खनन व वाहतुक करणा-यांवर एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सुमारे १२५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ११८ वाहनांची दंडाची रक्कम ९५ लाख ११ हजार पाचशे साठ वसुल केली आहे.तसेच ७ वाहन मालकांकडुन ३६ लाख ३६ हजार २८५ रुपये रक्कम भरण्यास नोटिसा देण्यात आल्या असुन वसुलीची कारवाई सुरु आहे.

तसेच जुन २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत अनधिकृत उत्खनन प्रकरणी शिरुर तालुक्यात ३१ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करुन १६ कोटी ४४ लाख ५७ हजार दोनशे रुपये दंडाचे आदेश देण्यात आले आहेत.

शिरुर तहसिल कार्यालयात अनधिकृत उत्खनन व वाहतुक करणा-यांवर शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत १६ वाहनांवर,रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ३ वाहनांवर,शिक्रापुर पोलीस स्टेशन अंतर्गत ४ वाहनांवर असे सर्व मिळुन २३ वाहनांवर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, यापुढेही अशीच धडक कारवाई सुरु राहणार असुन महसुल विभागाकडुन संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या