जातेगावला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर, ता.२५ एप्रिल २०१८(प्रतिनीधी)  : जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील चाळीस वर्षीय तरुणाने घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. संजय जनार्दन पतंगे (वय ४०, रा. जातेगाव खुर्द, ता. शिरूर; मूळ रा. तिऱ्हे, ता. सोलापूर, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत गणेश दिनकर मासळकर (जातेगाव खुर्द, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संजय पतंगे हा घरामध्ये बराच वेळ झाला तरी बाहेर येत नसल्याने शेजारील व्यक्तींनी त्याला आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता संजय छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या