दयानंद गावडेंना पोलीस महासंचालक पदक जाहिर

Image may contain: 1 person, smilingशिरुर, ता.२५ एप्रिल २०१८(सतीश केदारी) : पुणे जिल्हयात गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणा-या पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा(एल.सी.बी) चे प्रमुख दयानंद गावडे यांना क्लिष्ट अन थरारक गुन्हयाची उकल केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक नुकतेच जाहिर करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलात स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवत गुन्हेगारांवर जरब निर्माण केलेल्या गावडे यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा(एल.सी.बी) पदभार स्विकारल्यानंतर लोणावळ्यातील बहुचर्चित दुहेरी खुन खटल्याचा तपास वेगाने लावला.त्या पाठोपाठ चाकण येथील क्लिष्ट खुन प्रकरणाचा वेगाने तपास पुर्ण केला.गावडे यांनी गेल्या वर्षभरात अनेक वर्षांपासुन उकल न झालेले सुमारे सात ते आठ खुनांचा तपास लावला. पुणे जिल्ह्यातील गंभीर स्वरुपातील ८ दरोडयांची उकल केली.सुमारे २५ जब-या चो-या, २७ घरफोड्या यांचा अल्पावधीत तपास लावला.त्याचप्रमाणे १२ किलो चोरी गेलेले सोने मुद्देमालासह जप्त केले.पुणे जिल्हयात विविध ठिकाणी हवे असलेले २०० आरोपींना अटक  केली.

शिरुर पोलीस स्टेशनला कामाचा ठसा उमटवत त्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवत विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले.गावडे यांना शिरुर पोलीस स्टेशनला 'दबंग' पोलीस अधिकारी म्हणुन ओळख निर्माण झाली होती.त्यांनी शिरुर पोलीस स्टेशनला डिजेमुक्त अभियान राबविले होते.त्याचबरोबर अवैध दारुविक्रेते यांवर थेट तडिपारीच्या कारवाया केल्या होत्या.सर्वाधिक गुन्हेगारांवर वचक निर्माण केल्याने गुन्हेगांराना अक्षरश: सळो कि पळो केले होते.त्यांच्या काळात जेवढे गुन्हे घडले ते सर्व गुन्हे त्यांनी उघड केले होते तर बहुतांश गुन्हयात मुद्देमालासह आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश आले होते.

दयानंद गावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात पंढरपुर शहर, पंढरपुर तालुका, सांगोला आदी शहरातही कामाचा आलेख अनेक उंचावत अनेक महत्वाच्या गुन्हयातील आरोपींना जेरबंद केले आहे.गावडे यांना जाहिर झालेल्या पदकामुळे शिरुर शहर व शिरुर तालुका व पुणे जिल्हयातुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या