शिरुर तालुक्यातील प्रकाश लंघेंना पोलीस महासंचालक पदक

Image may contain: 1 personकरडे,ता.२६ एप्रिल २०१८(सतीश केदारी) : पुणे शहरातील बहुचर्चित संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खुन खटल्यातील आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुणावण्याच्या खटल्यात महत्वाची भुमिका बजावणा-या सहायक फौजदार प्रकाश लंघे यांना पोलीस महासंचालक सन्मान पदक  जाहिर करण्यात आले आहे.

पुणे शहरात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणुन प्रकाश लंघे हे सध्या काम पाहत आहेत.संगणक अभियंता  नयना पुजारी यांचा बलात्कार करुन खुन करण्यात आला होता व त्यानंतर या घटनेत  कुठलाही पुरावा नसताना पुरावा गोळा करण्यापासुन ते न्यायालयात आरोपींना शिक्षा सुणावण्यापर्यंत लंघे यांनी महत्वाची भुमिका बजावली.दुर्मिळातील दुर्मिळ खटला असल्याने अचुक कागदपञे,जबाब नोंदवुन पंचनामे घेणे,साक्षीदारांना न्यायालयात हजर ठेवुन सरकारी वकिलांना वेळोवेळी माहिती पुरविणे आदी कामे त्यांनी करत जबाबदारी चोख पार पडली.यामुळेच न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुणावली होती.पुणे शहरातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचे या खुन खटल्याकडे लक्ष लागलेले होते.

मुळचे करडे गावचे असलेले प्रकाश लंघे यांनी या पुर्वी पिंपरी पोलीस स्टेशन,वाहतुक शाखा, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, क्राईम ब्रांच पुणे,येरवडा पोलीस स्टेशन येथे चांगले काम केले आहे.कायदेविषयक उत्तम ज्ञान असणा-या लंघे यांनी खुन,खुनाचा प्रयत्न, दरोडा,बलात्कार, खंडणी आदी गुन्हे उघडकिस आणण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे.त्यांच्या याच कामांची दखल घेत या पुर्वी प्रकाश लंघे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.त्यांना जाहिर झालेल्या पदकाबद्दल जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, करडे गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांकडुन व तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या लंघेंना जाहिर झालेले पोलीस महासंचालक सन्मान पदक हे १ मे (महाराष्ट्र दिनी) प्रदान करण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या