ऊसाचा रस प्यायला थांबणं पडलं 'त्याला' महागात

No automatic alt text available.शिरुर, ता.२८ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : बो-हाडेमळा (ता.शिरुर) येथे हॉटेल वैभवनजीक रसाच्या गु-हाळावर रसपिण्यासाठी थांबलेल्या एकाच्या गाडीची काच फोडुन सुमारे तीन लाख रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना (दि.२७) रोजी घडली.

या संदर्भात विजय छबन महारनोर (वय.३०, रा. सध्या ढोकसांगवी, मुळ गाडगीळवस्ती, यवत ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय छबन महारनोर हे जय मल्हार ट्रॅव्हल्स मध्ये सुपरवायझर म्हणुन काम करत असुन या ट्रॅव्हल कंपनीचे आर्थिक व्यवहार महारनोर हे पाहत आहेत.

शुक्रवार (दि.२७) रोजी सकाळी अकराच्या सुमारास या ट्रॅव्हल कंपनीचे मालक सुहास मलगुंडे यांच्या मालकीची इनोव्हा गाडी एम.एच.१२ एल.व्ही ५५०५ घेउन ते कॉर्पोरेशन बॅंक येथे पैसे काढण्यासाठी आले होते.बॅंकेतुन त्यांनी कंपनीच्या अकाउंट वरुन तीन लाख रुपये काढले.व पैसे इनोव्हा कारच्या क्लिनर बाजुच्या सिट समोरील डिकीत ठेवले.व महारनोर हे गाडी घेउन कारेगावला निघाले.रस्त्याने जात असताना पुणे नगर हायवेवर बो-हाडेमळा येथे आले असता हॉटेल वैभव शेजारील रोडच्या कडेला असणा-या उसाच्या गु-हाळावर महारनोर यांनी गाडी थांबविली. गाडी लॉक करुन महारनोर हे रस पिण्यास गेले.रस पिउन झाल्यानंतर परत गाडीजवळ आले असता क्लिनर बाजुच्या पुढील दरवाजाची काच फुटलेली दिसली. त्यावेळी फिर्यादी यांनी गाडीजवळ जाउन डिकीत पाहिले असता,त्या डिकीतील पैसे आढळुन आले नाही.

त्यानंतर फिर्यादी यांनी सुहास मलगुंडे यांचे दाजी अजय आसवले यांना याबाबत सांगितले.व त्यानंतर त्यांनी शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेउन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी शिरुर पोलीसांनी चोरीची तक्रार दाखल केली असून, पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रविंद्र पाटमास हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या