शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या पुरस्कारांचे वितरण

सरदवाडी,ता.२८ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयातील वक्तॄत्व व निबंध स्पर्धेतील विद्यार्थी, स्पर्धेत 100 टक्के सहभागी शाळा व गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले.

शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या वतीने 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या दोन गटात निबंध व वक्तॄत्व स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या.सरदवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना स्मॄतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.निबंध स्पर्धेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालय(कासारी), न्यू इंग्लिश स्कूल(इनामगाव), विद्या विकास मंदिर(निमगाव म्हाळुंगी), महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय(पिंपळे जगताप), फ्रेंड्स सेकंडरी स्कूल(कोरेगाव भिमा), नागेश्वर विद्यालय(निमोणे) आदी 6 विद्यालयांना विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्कॄष्ठ कार्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इनामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील शिक्षिका शारदा राजेंद्र मिसाळ यांना ‘प्रेमचंद आदर्श हिंदी अध्यापिका पुरस्कार’ तर पुणे येथील श्री शिवाजी प्रिप्रेटरी मिलीटरी स्कूल मधील गजानन गोसावी यांना ‘हिंदी सेवा पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमास शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, सचिव मारूती कदम, प्रा.र्इश्वर पवार, हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष संजीव मांढरे, पंचायत समीती सदस्य आबासाहेब सरोदे, मुख्याध्यापक किशोर गायकवाड, हिंदी अध्यापक संघाचे सचिव शांताराम खामकर, उपाध्यक्ष सुनिता पिंगळे, कोषाध्यक्ष नसीमा काझी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव मांढरे यांनी केले.शांताराम खामकर यांनी सुत्रसंचालन केले तर सुनिता पिंगळे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या