माजी आमदारांची शिक्रापुरला भर उन्हात 'पोलीसगिरी'

Image may contain: 1 person, walking, sky and outdoorशिक्रापुर,ता.२९ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : वाहतुक कोंडित अडकलेल्या कॉलेजच्या परिक्षार्थी तर दुसरीकडे वाहतुकीचा उडालेला फज्जा यामुळे शिरुरच्या माजी आमदारांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतुक नियमन केले.

याबाबत माजी आमदार अशोक  पवार यांनी संकेतस्थळाशी अधिक माहिती देताना सांगितले कि, पुणे नगर रस्त्याने पुढे जात असताना शिक्रापुरजवळ आलो असताना काही विद्यार्थ्यांनी परिक्षेला जायचे असल्याचे सांगत वाहतुक कोंडीची समस्या सांगितली.

त्यावेळी स्वत: गाडीतुन खाली उतरलो.त्यावेळी एक अॅम्ब्युलन्सही या वाहतुक कोंडीत अडकली असल्याचे दिसले.त्यावेळी तत्काळ इतर वाहनांना बाजुला होण्यासाठी विनंती केली.यावेळेत  शिक्रापुर पोलीस स्टेशनचे मोजकेच कर्मचारी होते.दरम्यान स्थानिक तरुणांनी धाव घेत वाहतुक सुरळित करण्यासाठी मदत केली.जनतेच्या प्रश्नांसाठी विद्यमान आमदारांना लक्ष द्यायला वेळ नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

माजी आमदारांनी शिक्रापुरला स्वत: वाहतुक नियमन केल्यानंतर शिरुर तालुक्यात सोशल मिडियावर जोरदार फोटो व्हायरल होत आहेत.
Image may contain: sky and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या