शिरूरकरांची आगामी निवडणूकांत नवीन चेहऱयांना पसंती

No automatic alt text available.
शिरूर, ता. 30 एप्रिल 2018: सन 2019 मध्ये होणाऱया निवडणूकांमध्ये शिरूरकर नवीन चेहऱयांना पसंती देणार असल्याचा कौल www.shirurtaluka.comवर दिला आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.comने 'सन 2019 मध्ये होणाऱया निवडणूकांमध्ये तुम्ही खालीलपैकी कोणाला पसंदी द्याल?' अशी मतचाचणी 23 ते 29 एप्रिल दरम्यान घेतली होती. यावेळी सर्वाधिक मते नवीन चेहऱयांना मिळाली असून, त्या खालोखाल माजी आमदारांना पसंती दिली आहे.

मतचाचणी व निकाल पुढीलप्रमाणेः
सन 2019 मध्ये होणाऱया निवडणूकांमध्ये तुम्ही खालीलपैकी कोणाला पसंदी द्याल?
1) नवीन चेहरे - 54 टक्के
2) जुने चेहरे- 0 टक्के
3) आजी आमदार - 7 टक्के
4) माजी आमदार - 39 टक्के
5) समाजिक कार्येकर्ते- 0 टक्के


शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी आपले मत नोंदवत कौल दिला आहे. शिरूर तालुक्यातील सुशिक्षितांना राजकारणामध्ये नवीन चेहरा हवा आहे. नवीन चेहऱयांच्या बाजूने त्यांनी आपला कौल दिला आहे. परंतु, जुन्या चेहऱयांना व सामाजिक कार्यकर्त्यांना साफ नाकारले आहे. आजी आमदारांच्या बाजूने केवळ 7 टक्के मते नोंदविली गेली आहेत.

नवीन चेहेर का?
शिरूर तालुक्यातील नेटिझन्सना राजकारणामध्ये नवीन चेहरे हवे आहेत. आगामी निवडणूकांमध्ये नवीन चेहऱयांना संधी मिळाल्यास नक्कीच त्यांना नेटिझन्स आपला पाठिंबा व्यक्त करतील. जुने चेहरे व वर्षानुवर्षे राजकारणात असलेले व घरानेशाही मोडीत काढण्यात नेटिझन्सचा मोठा वाटा असणार आहे.

आजी आमदारांना का नाकारले?
मतचाचणीदरम्यान आजी आमदारांना नेटिझन्सने नाकारले आहे. शिरूर तालुक्यात रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. संकेतस्थळाने वारंवार मतचाचणी, चर्चा व बातम्यांमधून पाठपुरावा केला आहे. यावेळी प्रतिक्रियांच्या माध्यमातून नेटिझन्सनी आजी आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

आजी आमदारांना संधी?
नेटझन्सनी नवीन चेहऱयांपाठोपाठ माजी आमदारांना पसंती दिली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये नवीन चेहऱा अथवा माजी आमदार यापैकीच कोणा एकाला आमदार होण्याची संधी आहे. पंरतु, कोणता माजी आमदार पुढील काळात आमदार होईल? हे काळच ठरवेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या