...अखेर शिक्रापूर पोलीस स्टेशनला 'सिंघम'ची नियुक्ती

Image may contain: 1 personशिक्रापुर,ता.१ मे २०१८(सतीश केदारी) : गुन्हेगारांमध्ये प्रचंड दबदबा  असलेल्या 'सिंघम' पोलीस अधिका-याची शिक्रापुर पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांची नुकतीच बदली करण्यात आली.त्यांच्या बदलीनंतर या पोलीस ठाण्यात संतोष गिरीगोसावी यांची पोलीस निरीक्षक म्हणुन बदली करण्यात आली असुन नुकताच त्यांनी पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतला आहे.त्यांच्या या नियुक्तीबाबत  संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलखुलासपणे सविस्तर चर्चा केली.

मुळचे अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील असणा-या गिरीगोसावी यांनी  एम.एस.सी अॅग्री, एल.एल.बी असे उच्चविद्याविभुषित आहे.पोलीस दलात नोकरीची सुरुवात मुंबईत केली असुन मुंबईत गुन्हे शाखेत सुमारे १० वर्षांहुन अधिक काळ नोकरी केली आहे.त्यानंतर गडचिरोलीच्या नक्षलवादी प्रभावित क्षेञात ३ वर्षे दमदार केले असुन नक्षलींचा बिमोड करण्यासाठी विशेष मोहिम राबविली आहे.नाशिक मध्ये ५ वर्षे तर जळगाव ला चार वर्षे काम केले आहे.

पुणे जिल्हयात  नेमणुक झाल्यानंतर  खेड, चाकण पोलीस ठाण्यात त्यांनी कामाचा ठसा उमटवला असुन चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील श्याम दाभाडे एन्कांउटर मध्ये विशेष सहभाग होता.त्याच बरोबर अवैध सापांची तस्करी उघड करण्यात यश आले होते.चाकण हद्दीतील एमआयडीसीतील गुन्हेगारी पुर्णपणे मोडित काढलेली होती.त्या भागात सिंघम म्हणुन एकप्रकारे ओळखले जात आहे.

याबाबत संवाद साधताना संतोष गिरीगोसावी यांनी अधिक सांगितले कि, शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेची घडी व्यववस्थित बसवण्याबरोबरच शांतता राखणे हे महत्वाचे काम असुन भाईगिरी, दादागिरी या भागात चालु देणार नाही.अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली जाणार असुन वाहतुक व्यवस्था चांगली निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.सोशल मिडियावर  अफवा चुकिच्या पद्धतीने पसराविणा-यांवरही कारवाई केली जाणार असुन त्या पद्धतीने सोशल मिडियावर बारकाइने लक्ष देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.मुली, महिला यांच्या प्रश्नांवर आगामी काळात विशेष काम केले जाणार असुन त्या पद्धतीने विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम राबविणार आहे.सर्वांशी थेट संवाद साधणे यावर भर दिला जाणार असुन जनता  व पोलीस यांत समन्वय राखणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

शिक्रापुर पोलीस स्टेशनला गलांडे यांच्या कार्यकाळात काहिशी मरगळ आली होती.परंतु गिरीगोसावी यांच्या नियुक्तीनंतर प्रथमच अधिका-यांमध्ये चैतन्य पहावयास मिळत असुन नागरिकांकडुन चांगला अधिकारी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
नागरिकांनी अडचणी व तक्रारींसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक : ९८२३८५८१००

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या