शिरुर तालुक्यात अधिकारी बदलाचे वारे लागले वाहू...

शिरुर, ता. २ मे २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात अनेक वर्षांपासून काम करणा-या अधिका-यांच्या बदल्या होणार असून कोणा-कोणाची बदली होणार याबाबत चर्चा सुरु आहेत.

कोरेगाव भिमा दंगलीनंतर शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांची बदली करण्यात आली.त्यांच्या जागी डॅशिंग म्हणुन ओळख असलेल्या पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे या महिन्यात काही पोलीस अधिका-यांचा  कार्यकाळ संपला असल्याने त्यांची सुद्धा बदली होणार असुन काहीजन प्रतिक्षेत असल्याचे समजते.काही अधिकारी निवृत्त होणार असुन त्या जागी नवीन नेमणुका केल्या जाणार आहेत.आवडत्या व सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी या साठी 'तशी' फिल्डिंग लावली असल्याच्या चर्चा कानोकानी ऐकायला मिळत आहे.

शिरुर तालुक्यात आगामी काळात होणारी विधानसभा, लोकसभा या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कोणा कोणाची बदली होणार? नवीन कोणाची नेमणुक होणार याबाबत सर्वसामान्यांकडुन तर्क लढवले जात असुन अधिकारी बदलांचे वारे आतापासुन वाहु लागले आहे. शिरुर तालुक्यात घडलेल्या अप्रिय घटना, वाढलेली गुन्हेगारी याबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतले जातात याचीच उत्सुकता  सर्वसामान्यांना लागुन राहिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या