भुजबळांना जामीन मंजूर झाल्याने तळेगाव, शिक्रापुरात जल्लोष

Image may contain: 32 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता.६ मे २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) :
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने तळेगाव ढमढेरे येथे फटाके वाजवून, गुलाल उधळून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र सदन व मनी लाँडरिंग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने ५ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने तळेगाव ढमढेरे येथे  कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलासदादा नरके, उपसरपंच उज्वला भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ,  निलम भुजबळ, सोमनाथ कुदळे, समता परीषदेचे संघटक अरुण भुजबळ,  रेश्मा गायकवाड, हनुमंत भुजबळ, शिवाजी भुजबळ, दत्तात्रय भुजबळ, काळूअण्णा भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, संतोष भुजबळ, शिरुर तालुका पोलीस मीत्र संघटनेच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा मंगल भुजबळ, सचिन पंडीत आदी कार्यकर्ते तसेच विविध बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्वसामान्य जनतेचा कळवळा  असलेल्या नेत्याला उशीरा का होईना न्याय मिळाला असून छगन भुजबळ यांना  मिळालेला  हा जामीन म्हणजे सत्याचा व जनतेचा विजय असल्याची भावना यावेळी बोलताना शिरुर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांनी व्यक्त केली.

यावेळी कैलासदादा नरके, सोमनाथ कुदळे, निलम भुजबळ, बापू भुजबळ आदी कार्यकर्त्यानीही उत्स्फूर्तपणे मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष भुजबळ यांनी केले तर सचिन पंडित यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या