पिंपळाची वाडीतील घोडनदी पाञात बेकायदेशीर वाळू उपसा

निमोणे, ता.६ मे २०१८ (तेजस फडके) : निमोणे (ता.शिरुर) येथील पिंपळाची वाडी येथुन घोड नदीच्या पात्रातून बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात वाळु उपसा चालु असुन लाखो रुपयांचा महसुल बुडत असताना महसुल खात्याचे वरिष्ठ अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूचे ठेके आहेत.परंतु कोणत्याही वाळूच्या ठेक्याचा लिलाव झालेला नाही. तरीसुद्धा "वाळुसम्राट" अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळु उपसा करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवत आहेत.परंतु महसुल खात्याचे अधिकारी याकडे कानाडोळा का..? करत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.वाळु उपश्या मुळे नदीपात्रात मोठे मोठे खड्डे पडत असुन नदीपात्राची अक्षरशः चाळण होत आहे.या वाळु सम्राटांना राजकीय वरदहस्त असल्यानेच वाळूसम्राट मोकाट झाले असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत निमोणे गावचे तलाठी संतोष गाडगे यांना विचारले असता त्यांनी वाळुउपसा चालु असल्याबाबत काहीही माहिती नसल्याचे बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या