राजकारणापलीकडे मला समाजहित महत्वाचे: प्रदिप कंद

शिरुर,ता.८ मे २०१८(सतीश केदारी) : आयुष्यात स्वार्थ न पाहता राजकारणापलीकडे जाउन समाजाचे प्रश्न महत्वाचे असल्याने ते सोडविणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  प्रदिप कंद यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त www.shirurtaluka.com संकेतस्थळाने त्यांच्याशी संवाद साधला असता,त्यांनीही दिलखुलासपणे अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रश्न : प्राथमिक ते उच्च शिक्षण कोठे झाले ?

माझं १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण लोणीकंद गावात प्राथमिक शाळेत झाले.त्यानंतर पुढील ५ वी ते १० वी चे शिक्षण पुण्यातील  मॉडर्ण महाविद्यालयात झाले.११ वी ते उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेजला पुर्ण केले.

प्रश्न : तुमचं बरचंस शिक्षण वसतीगृहात झालयं ?
होय.गावाकडुन पुण्यात शिकायला आल्यानंतर राहायचं कोठे, शिक्षण घ्यायचं कसं हा प्रश्न होता.मग एका वसतीगृहात राहायला लागलो.त्यामुळे वसतीगृहात राहुन शिकलो.याचा माझ्या आयुष्यात भविष्यात खुप मोठा फायदा झाला.

प्रश्न : आई वडीलांविषयी काय सांगाल ?

आई चा स्वभाव मृदु तर वडिलांचा कडक.वडील शिस्तप्रिय होते.त्यामुळे अभ्यासाला कंटाळा केला कि अनेकदा वडिलांचा मार खावा लागायचा.वसतीगृहात असताना वडील अन मोठा भाउ पैसे द्यायला यायचे.चुकिचा वागलो कि कडक शिक्षा ही ठरलेली असायचीच.त्यामुळे चांगले संस्कार मिळत गेले.लहानपणापासुनच शिस्त लागत गेली.

प्रश्न : तुमची आवड काय आहे ?

मला खेळाची प्रचंड आवड पुर्वीपासुन आहे.क्रिकेट खेळायला गेलो कि तासंतास खेळत असो. सर्वच खेळ प्रचंड आवडायचे परंतु क्रिकेटमध्ये जास्त रुची होती.त्यामुळे राज्य पातळीवर खेळायला संधीही मिळाली आहे.

प्रश्न : राजकारणात  कसे आलात ?
क्रिकेट व अन्य खेळ खेळत असताना एका टप्प्यावर खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.राजकारणात यायचं ठरविलं.सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणुन बिनविरोध म्हणुन निवडुन आलो.त्यानंतर सरपंच झालो ते हि बिनविरोध.तेव्हा ग्रामपंचायत ला ११-७ अशा फरकाने बिनविरोध सदस्य निवडुन आले.त्यात चार जागांची निवडुन झाली अन प्रथमच सरपंच म्हणुन गावात काम करण्याची संधी मिळाली.१९९७ साली गावात ख-या अर्थाने राजकिय कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हापासुन कधी मागे वळुन पाहिलंच नाही.

प्रश्न : राजकारणातील तुमची तत्वे काय ?
राजकारणात काम करत असताना तळागाळातील सर्वसामान्य घटक माणुन त्या प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे या मताशी मी आजही ठाम आहे.हे तत्वे पाळुन मी आजतागायत राजकारण करतो आहे.

प्रश्न : जिल्हा परिषद अध्यक्षच का व्हावं वाटलं ?

गावपातळीवर राजकारण करत असताना चांगल्या कामाची चुणुक दाखवता आली.त्याची पोचपावती म्हणुन जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली.वडील जि.प. लढले होते.त्यामुळे वडीलांचे स्वप्न मला पुर्ण करायचे होते.

प्रश्न : आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता ?

जिल्हा परिषदेवर निवडुन गेलो.त्यानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची जेव्हा वेळ आली.तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असावा कारण तेव्हा वडीलांचे स्वप्न मला पुर्ण करता आले होते.

प्रश्न : जिल्हा परिषदेत नाविन्यपुर्ण योजना आपण राबविल्या होत्या ?

होय.पुणे जिल्हा परिषदेवर काम करताना अनेक अनुभव आले.परंतु अधिकारी व पदाधिकारी यांचा समन्वय राखुन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले.शाश्वत विकास करण्यावर भर दिला.शाळांची पुर्वी पटसंख्या कमी होती परंतु पटसंख्या वाढवणारी व अंगणवाडयांना पोर्षण लागु करणारी महाराष्ट्रातील पुणे जिल्हा परिषद एकमेव जिल्हा परिषद ठरली.शिक्षण विभागात पारदर्शक  बदल्या केल्या.आरोग्या मध्ये महिलांसाठी प्रतिभा आरोग्य संपन्न योजना राबविली.समाजकल्याण विभागातुन प्रत्येक १३ तालुक्यात ग्राम अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न केले.या प्रकारच्या अनेक नाविण्यपुर्ण योजना राबविल्याने राज्यात पुणे जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवता आला.

प्रश्न : विकासकामांबाबत  काय सांगाल ?

जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळात सुमारे साडेतीन हजार कोटींची कामे जिल्ह्यात केली.त्यावेळेस इतर मार्गांसाठी पैसे मिळत नव्हते.परंतु प्रयत्न केल्यानंतर निधी मिळविता आला.सुमारे १०० कोटींची रस्त्यांची कामे करता आली.

प्रश्न : जिल्हा परिषदेत काम करताना पाठबळ कोणाचे होते का ?

हो.निश्चितच वरिष्ठ नेत्यांनी पाठबळ दिलेच.परंतु स्थानिक पदाधिका-यांनी मोलाची साथ दिली.त्यामुळे विकासकामांचा डोंगर उभा करता आला.

प्रश्न : शिरुर हवेलीत जास्त निधी तुम्ही दिला ?

हो.पुणे जिल्हा परिषदेत जिल्हयाचा पदाधिकारी म्हणुन काम करताना सर्वाधिक निधी शिरुर व हवेलीसाठी दिला.अनेक गावांत पाण्याचे, रस्त्यांचे प्रश्न होते.तळागाळातील जनतेचे हे प्रश्न स्वस्थ बसु देत नव्हते.त्यामुळे अधिकाधिक निधी शिरुर हवेलीत दिला.यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढता आला.

प्रश्न : सध्याच्या राजकारणाविषयी काय सांगाल ?

राजकारणात मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही.लोकप्रतिनीधी सर्वसमावेशक असावा.खेचाखेची चे राजकारण असु नये.परंतु दुर्दैवाने सध्या लोकप्रतिनीधींची सर्वसामान्यांना भिती वाटते.सर्वसामान्यांना लोकप्रतिनीधींची भिती न वाटता आधार वाटला पाहिजे.या मताशी मी ठाम आहे.

प्रश्न : आमदार व्हायला आवडेल का ?

जनतेने संधी दिली तर नक्कीच तळागाळातील व्यक्तींसाठी व सर्वांगीन विकासासाठी काम करायला निश्चितच आवडेल.   


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या