सादलगावमध्ये पाण्यात बुडून मुलीचा जागीच मृत्यू

सादलगाव, ता.९ मे २०१८ (संपत कारकुड) : सादलगाव (ता.शिरुर) येथे भिमा नदी पाञात बुडुन अल्पवयीन मुलीचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (दि.८) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

या घटनेत प्रतिभा दत्ताञय फडतरे (वय. १२, रा. सादलगाव, ता.शिरुर) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याबाबत  सविस्तर माहिती अशी कि, मंगळवार (दि.८) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन मुली ह्या भिमानदीवर पोहण्यासाठी गेल्या होत्या. सर्वच मुली पाण्यात उतरुन पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुली पाण्यामध्ये बुडु लागल्या.

यावेळी बुडणा-या मुलींनी जीव वाचवण्यासाठी मोठा आरडाओरडा केला. भिमानदी पाञात कपडे  धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा आरडाओरडा ऐकला. त्यातील काही महिलांनी धाडस व प्रसंगावधान दाखवत मुलींना वाचण्याचा प्रयत्न केला. व इतर  नागरिकांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर शेजारील काही तरुणांनी लागलीच धाव घेत पाण्यात उड्या मारल्या व तीन मुलींना तत्काळ पाण्याबाहेर काढले. तर तीन पैकी प्रतिभा हिची प्रकृती खालावल्याने जागीच मृत्यु झाला. तर इतर दोन मुलींना उपचारांसाठी मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर  असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या