भारतीय जनता युवा मोर्चाच्या संपर्कप्रमुखपदी सचिन मचाले

Image may contain: 10 people, including Pradip Sonawane, people smiling, people standingमांडवगण फराटा,ता.९ मे २०१८(प्रतिनीधी) : सचिन भरत मचाले यांची पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या संपर्कप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली.

निवडीचे पञ भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुदर्शनभाऊ चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, भाजप सहकार आघाडीचे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब खळदकर, खरेदी, विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे,ग्रां.प.सदस्य नानासाहेब गायकवाड, युवा नेते कैलासकाका फराटे ,नवनाथ गायकवाड उपस्थित होते.

सचिन मचाले हे शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे आणि किसान मोर्चा अध्यक्ष दादा पाटील फराटे यांचे अतिशय विश्वासु सहकारी मानले जातात.निवडीनंतर पक्ष संघटनेवर भर देऊन आपल्या संपर्काच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदार संघासोबत संपूर्ण जिल्ह्यातील युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणलं जाईल अस त्यांनी या वेळी सांगितलं.येत्या आगामी काळात गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता असा उपक्रम हाती घेतला जाईल असही त्यांनी सांगितलं.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या