रांजणगावला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

रांजणगाव गणपती,ता.१० मे २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथे पाच सामुदायिक विवाह सोहळे संपन्न झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ.संतोष दुंडे यांनी दिली.

रांजणगाव देवस्थान व पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मिय बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.या विवाह सोहळ्यात दोन बौद्ध धर्मिय व तीन हिंदु धर्मिय पद्धतीने विवाह संपन्न झाले.

या विवाह सोहळ्यासाठी देवस्थानच्या वतीने मनी मंगळसुञ, साखरपुडा,हळदी व लग्नाचे सर्व साहित्य, संसारोपयोगी ५१ भांडयाची झाल व-हाडींसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.विवाहित नवदांपत्यांना देवस्थान चे सचिव नारायण पाचुंदकर यांच्या हस्ते आंब्याची रोपे देण्यात आली.विवाहाचे पौरोहित्य मोरेश्वर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी यांनी केले.यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दादामामा शेळके, खजिनदार शेखर देव,भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, दत्ताञय पाचुंदकर, सरपंच, उपसरपंच, अनिल दुंडे, दत्ता लांडे, सचिन दुंडे, राजेंद्र दरेकर, निलेश लांडे आदी उपस्थित होते.

सोहळा पार पडण्यासाठी देवस्थान चे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी सर्व क्षेञातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या