सरपंचपदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २५२ उमेदवारी अर्ज

Image may contain: textशिरूर, ता. १३ मे २०१८(प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी शेवटच्या दिवशी ४८ तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २५२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याची माहिती शिरूरचे तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.

शनिवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भर उन्हात अनेकांनी तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती.तर शेवटच्या दिवशी धावपळ होउ नये म्हणुन अनेक मातब्बर उमेदवारांनी अगोदरच फॉर्म दाखल केले होते.दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात आजी माजी सरपंच, विद्यमान सदस्य व नवीन चेहरे व महिलांची संख्या लक्षणीय आहे.

सरपंच पदासाठी आलेले एकुण अर्ज  शिरूर ग्रामीण-१०, अण्णापूर -१२,सरदवाडी -२,तर्डोबाचीवाडी -११,कर्डेलवाडी -६,वाजेवाडी-७ असे मिळून सहा जागेसाठी ४८ उमेदवार सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर  ग्रामपंचायत सदस्यपदासाठी शिरूर ग्रामीण-७४,अण्णापुर-३६, सरदवाडी-३१,तर्डोबाचीवाडी-४५,कर्डिलवाडी-३०,वाजेवाडी-३६ असे मिळून २५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती शिरूरचे तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी १४ मे रोजी तर १६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या