शिक्रापूरचे पोलिस सातपुतेंनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न

Image may contain: one or more people and people sitting

Image may contain: 1 person, closeupशिक्रापूर, ता. 18 मे 2018: शिक्रापूर पोलिस चौकीतील पोलिस नाईक प्रल्हाद शंकर सातपुते यांनी आत्महत्याच केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
 
शिक्रापूरमध्ये सातपुते (वय 46, रा. मूळ गाव राजेगाव, ता. दौंड; सध्याचे रा. शिरूर) यांचा मृत्यू गळफासाने झाल्याचे रविवारी (ता. 13) आढळले होते. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त होत होते. सातपुते यांच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली होती. शिवाय, सातपुते यांची अकाली 'एक्झिट' चटका लावणारी ठरली होती. परंतु, तपासामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले, की सातपुते यांचा मृत्यू रविवारी (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास झाला. त्यापूर्वी ते शिरूरहून एसटीने शिक्रापुरात आले आणि पोलिस स्टेशनमध्ये येऊन पुढे शिक्रापुरातील एका दुकानातून दोरी खरेदी केली होती. दोरी घेऊन ते जातेगाव खुर्दमार्गे पुढे मुखईच्या रस्त्याने पिंपळे खालसाला गेले. या रस्त्यातील एका चंदनाच्या झाडाजवळ त्यांनी आपली बुलेट गाडी उभी करून त्यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय, आवश्‍यक पुरावेही उपलब्ध झाले आहेत. हातातील अंगठी आणि पाकीट त्यांनी आपल्या शिरूरच्या घरी ठेवले होते. घटनास्थळापर्यंत पोचताना ते ज्यांना-ज्यांना भेटले, त्यांचे जबाबही घेतले आहेत. त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूची जखम झाडाच्या फांदीची असून, पायाची जखम मृत्यूपूर्वीच्या हालचालीची आहे. त्यांच्या खिशात त्यांच्या भावाचे नाव, मोबाईल नंबर, एवढ्याच वस्तू मिळाल्या असून, त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डमध्येही फार काही संशयास्पद आढळलेले नाही. त्यांच्या मोबाईलचा डाटा तपासणे चालू असून, प्राथमिक तपासानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या