शिक्रापूरमधील बलात्कार करणाऱया शिक्षकाला कोठडी

Image may contain: one or more people

शिक्रापूर, ता. 3 जून 2018: विद्याधाम प्रशालेतील शिक्षक सुनील जानकर याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश शिरूर न्यायालयाने दिला. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

जानकर याने जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील जाधव नावाच्या शिक्षकाच्या खोलीत मुलीवर अत्याचार केला. त्या जाधवचा शोध पीडित मुलीच्या नातेवाइकांसह चाकण रोड वस्तीवरील युवक घेत आहेत. तो ताब्यात मिळताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला सहआरोपी करण्याबाबत पोलिसांकडे पुरावे देणार असल्याची माहिती काका मांढरे, सचिन मांढरे व पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश घारे यांनी दिली.

शिक्रापूरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार
शिक्रापूर, ता. 25 मे 2018 : येथील विद्याधाम प्रशालेमधील शिक्षक आबासाहेब जानकर (वय 31, मूळ रा. मुढाळे, ता. बारामती, जि. पुणे) या शिक्षकाने अभ्यास घेण्याच्या नावाखाली विद्यार्थिवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

जानकर हा पीडित विद्यार्थिनीचे अश्लिल छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करून हा प्रकार सुरू केल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक युवकांनी त्याला शाळेतून मारहाण करत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित युवतीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर याने संबंधित मुलीला अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने त्याचा शिक्षक मित्र जाधव (जातेगाव बुद्रुक) याच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिचे अश्लिल छायाचित्र काढले. संबंधित छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर जानकर याला गुरुवारी (ता. 24) दुपारी तीनच्या सुमारास विद्याधाम प्रशालेमध्ये गाठले. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर युवकांनी त्याला मारहाण करत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, जानकर याच्यावर बलात्कार व बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या जाधव शिक्षकाचीही चौकशी करून त्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.

आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडीत मुलगी ७ मे रोजी शाळेत असताना जानकर याने राहिलेला अभ्यास घेण्यासाठी शाळेच्या लॅबमध्ये बोलाविले. त्यांनतर तिला मी तुझा राहिलेला अभ्यास माझ्या घरी घेतो असे सांगितले, त्यांनतर ९ मे रोजी जानकरने शाळा सुटल्यानंतर रस्त्याला थांब असे सांगितले.  त्यांनतर तिला आपण अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सरांच्या घरी जाऊ असे सांगितले व त्या सरांच्या घरी तिला नेले. त्यांनतर जानकर यांनी तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा हात अश्लिल वर्तन करत अश्लिल छायाचित्रे काढली व धमकी दिली. ११ मे रोजी जानकर यांनी पुन्हा अभ्यास करण्यासाठी स्वतःच्या घरी बोलाविले त्यांनतर तिला तुझ्या गणिताच्या नोट्स मी बेडरूम मध्ये ठेवल्या आहेत तेथून घे असे सांगितले. विद्यार्थिनी बेडरूम मध्ये गेली असताना जानकर पाठीमागून गेला व पुन्हा अश्लील कृत्य केले. १५ मे रोजी जानकरने पुन्हा शाळेमध्ये माझ्या मोबाईल मध्ये आपले छायाचित्रे असल्याचे सांगत धमकी दिली. परंतु त्यांनतर पीडीत मुलीने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या