शिरुर बाजारसमितीत भुईमुग शेंगांची आवक वाढली

शिरुर, ता.२६ मे २०१८(प्रतिनीधी) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शुक्रवार(दि.२५) रोजी ओल्या भुईमूग शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणा-या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेंगांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु झाली आहे.श्री स्वामी समर्थ व्हिजिटेबल कंपनीच्या संजय लकडे यांचे अडतीवर भुईमूग शेंगांना जास्तीत जास्त रूपये २५०० क्विंटल या प्रमाणे बाजार मिळाला.

नवीन मार्केट यार्ड वर दररोज सकाळी ८ वाजण्याच्या आत शेंगा विक्रीसाठी आणाव्यात असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती ने शिरुर बाजार आवारासह तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप, आदी ठिकाणी शेतक-यांसाठी विविध नाविन्यपुर्ण उपक्रम व सुख सोयी निर्माण केल्याने शिरुर, श्रीगोंदा पारनेर सह  तालुक्यातील नागरिकांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या