तेजस फडके यांना कृषी गौरव पुरस्कार

Image may contain: 7 people, people smiling, people standing

शिंदोडी,
ता.३० मे २०१८ (प्रतिनीधी) :
येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी मंडळाचे अध्यक्ष तेजस फडके व सदस्य संदीप फडके यांना जीवन गौरव प्रतिष्ठाण देऊळगाव रसाळ (ता. बारामती) यांच्या वतीने सन २०१८ चा कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शिंदोडी येथील १८ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी बचत गट २०१५ साली स्थापन केलेला आहे.त्या बचत गटाच्या माध्यमातून शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेण्याबरोबर सेंद्रिय शेती करण्याकडे या शेतकऱ्यांचा कल आहे.शेतकरी बचत गटाच्या  माध्यमातून शेतीपुरक वेगवेगळे व्यवसाय हे शेतकरी करत आहेत.त्यामुळे या गटातील कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन आयुक्त विश्वासराव भोसले,बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार, महाऑर्गनिक अँड रेसिडीव्ह फ्री फार्मार्स अशोशियनचे संचालक कल्याणराव काटे, हेल्दी हार्वेस्ट इंडियाचे विकी राठी, बारामती फार्मार्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक वाबळे व शेतकरी गटाचे गणेश भोस, राहुल ढेपे, गणेश फडके व मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या