पोदार स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Image may contain: 3 people, people smiling, people standing and indoorशिरूर, ता ३१ मे २०१८(प्रतिनीधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

२०१७-१८ या शैक्षणिक सत्रात झालेल्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविल्याची किमया साधली. शाळेतील १०० टक्के विध्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे पोदार ईंटरनँशनल स्कूल शिरूर ची ही पहिलीच बँच होती. अनुष्का संतोष पठारे हिने ९४ टक्के मिळवून तालुक्यासह शाळेतून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला; ओम संतोष पोटे या विध्यार्थ्याने ९२.८ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक  तर कृतिका रणपिसे हिने ९२.६ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला, तर सई संदीप कोकरे ९१.4 टक्के मिळवून चौथा क्रमांक मिळवला व आसावरी साळवे हिने  ९०.४ टक्के मिळवून पांचवा क्रमांक पटकाविला.

पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका मीनल वैद्य, संतोष शिंदे, रोहित खोमणे, निलेश साखरे, रितूकुमारी शहा, विजय गरुड या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या