शिरुरला शेतक-यांचे मागण्यांसाठी धरणे आंदोलन

Image may contain: 9 people, people standingशिरुर,ता.२ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुका शेतकरी संघटना(शरद जोशी प्रणित)च्या वतीने शिरुर तहसिल कार्यालयावर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी,दुधाला हमीभाव,शेतमालाला दिडपट भाव आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार,महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सचिव नंदाताई जाधव,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे,शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे,शाखाध्यक्ष रोहिदास काळे, वारकरी संप्रदायाचे सिद्धनाथ राउत महाराज,सुभाष जगदाळे,मच्छिंद्र बांदल,सुरेश काळे,बाळासाहेब काळे,संभाजी काळे,मेघराज दुर्गे ,केरुभाऊ दुर्गे, संतोष जगताप,बाळु लंघे,तुकाराम पोटे,ञिंबक  थोरात,तुकाराम पोटे, आदींसह शिरुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.

या मोर्चाची सुरुवात शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती येथुन सुरुवात झाली.यानंतर संपुर्ण शहरात शेतक-यांनी मोर्चा काढला.शिरुर तहसिल कार्यालय येथे झालेल्या सभेत राज्यातील शेतक-यांना शासनाने ठरवुन दिलेला दुधदर २७ रु हमीभाव मिळत नाही,शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी,विज बिल माफ,शेतमालाला दिडपट हमी भाव देण्याची मागणी  यावेळी शेतक-यांनी केली.

यावेळी सिद्धनाथ राउत महाराज, तुकाराम पोटे, नंदाताई जाधव,विठ्ठल पवार आदींनी भाषणे करत सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन निवडणुक नायब तहसिलदार जाधव, शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी स्विकारले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या