सादलगाव ग्रामपंचायतीत मेळ बसेना; विकासकामे ठप्प

No automatic alt text available.सादलगाव, ता. 9 जून 2018 (प्रतिनिधी): येथील गायरान हददीतील अतिक्रमनाच्या मुद्यावरुन दोन सदस्य बाद झाल्यानंतर उदभवलेल्या वादाच्या राजकारणातून सरपंच व सदस्यांमध्येही गावच्या विकासाबाबत कोणताच मेळ बसत नसल्यामुळे गावात सध्या विविध विकास कामाला खिळ बसली असून, दोन वर्षाचा निधी खर्चाविना पडून आहे.

चौदाव्या वित्त आयोगाचे थेट अनुदान ग्रामपंचायतीना मिळत असल्यामुळे गावामध्ये दोन वर्षात भरवी कामे झाली व काही पुर्णत्वाकडे आहेत सन 2017-18 मध्ये मात्र आयोगाकडुन सुचविलेल्या कामांना मंजुरी मिळाली. परंतु, कोणतेही काम सध्या ग्रामपंचायतीने हातामध्ये घेतलेले नसून काम करण्यासाठी सरपंच व सदस्यांमध्ये कोणतीही सुसंवाद घडत नसल्यामुळे गावचा विकास मंदावला आहे.

सरपंचाना जबाबदार धरणार?
गावातील राजकारणाचा थेट फटका विकासकामावर बसत असल्यामुळे गावातील कामे जर झाली नाही तर जबाबदार कोणाला धरणार? असा मुददा गावच्या ग्रामसभेमध्ये लेखी दाखल झाला. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकाला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या