परिस्थितीवर मात करत प्रांजलचे बारावीत यश

कारेगाव,ता.१५ जुन २०१८(प्रतिनीधी) : कारेगाव येथील प्रांजल फलकेने परिस्थितीवर मात करत सीबीएसईच्या बारावी परिक्षेत ९५ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

प्रांजल शिवाजी  फलकेची घरची परिस्थिती तशी जेमतेम.आई बचत गटाच्या माध्यमातुन शिरुर येथे छोटा व्यवसाय चालवते.आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत प्रांजल फलके ने सीबीएसईच्या बारावी परिक्षेत ९५ टक्के गुण मिळविले आहेत.

प्रांजल हि पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालयात शिकत होती.दहावीपर्यंतचे शिक्षण  शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत झाले आहे.प्रांजल ने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल कारेगाव सह संपुर्ण  शिरुर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.या यशाबद्दल प्रांजल ने आई व वडीलांचे श्रेय असल्याचे सांगत वडीलांचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या